परमबीर सिंहांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच

ठाणे : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मर्जीतील अधिका-यांवर सरकारची वक्र नजर असल्याचे म्हटले जात असून अशा अधिकारी वर्गाच्या बदल्या सुरुच आहेत. काही दिवसांपुर्वी ठाण्यातील खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे व ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखा घटक क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची बदली झाली आहे. परमबीर सिंह यांच्यासोबत व मर्जीने काम केले असल्याची या दोघांची ओळख निर्माण झाली होती. या ओळखीच्या शिक्क्यामुळे त्यांची बदली करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. गुन्हे अन्वेषण शाखेत काम करतांना नितीन ठाकरे यांनी चांगली कामगिरी केली आहे. बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यासह लष्कराच्या पेपरफुटीचा देखील त्यांनी उलगडा केला आहे. त्यांच्या काळात परमबीर सिंह हे त्यांचे वरिष्ठ होते. नितीन ठाकरे यांची बदली नंदुरबार येथील जात पडताळणी समितीत करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here