3 लाख 60 हजाराची मागीतली लाच! पीएसआयवर आली कारवाईची टाच!!

पुणे : जाहिरात फलक लावण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याकामी मागितलेली 3 लाख 60 हजाराची लाच पोलिस उप निरीक्षकाच्या अंगलट आली आहे. लाच घेतली नसली तरी मागणी केल्याचे सिद्ध झाल्यामुळे येरवडा वाहतुक शाखेतील पोलिस निरिक्षकावर लाच लुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसवराज धोंडोपा चित्ते असे या पोलीस उप – निरीक्षकाचे नाव असून येरवडा वाहतूक शाखेत पोलिस उप निरीक्षक म्हणून नेमणूकीला आहे. या प्रकरणातील तक्रारदारास जाहिरात फलक लावण्यासाठी वाहतूक विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज होती. नाहरकत दाखला मिळण्याकामी तक्रारदाराने पोलिस विभागात अर्ज केला होता. या कामासाठी बसवराज चित्ते या पोलिस उप – निरीक्षकाने तक्रारदाराकडे 3 लाख 60 हजार रुपयांची मागणी केली होती. या तक्रारीची 16 एप्रिल, 20 एप्रिल व 3 मे रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत बसवराज चित्ते यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. अखेर एसीबीकडून याप्रकरणी रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here