दया नायक “कम बॅक मुंबई”?

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्धी मिळवलेले पोलिस अधिकारी दया नायक यांना मॅट कडून मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती पुढे आली आहे. दया नायक यांच्या गोंदीया येथील बदलीला मॅटकडून स्थगिती मिळाली असल्याचे म्हटले जात आहे. दया नायक यांची गोंदीया येथे बदली करण्यात आली होती.

दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कायम राहणार असल्याची विश्वसनीय सुत्रांकडून माहिती मिळत असून त्यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे सांगण्यात आले होते. दया नायक यांची दहशतवाद विरोधी पथकातून गोंदियाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात करण्यात आली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमक्यांच्या तपासाचे काम दया नायक यांच्याकडे होते. या बड्या नेत्यांना धमकी आल्याने त्याचा तपास एटीएसतर्फे दया नायक यांच्याकडे देण्यात आले होते. या तपासकामी त्यांना मुंबई बाहेर आणि राज्याच्या बाहेर देखील जावे लागले होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here