समृद्धी केमीकल्स प्रकरणी औद्योगिक सुरक्षा अधिका-यांवर कारवाई होणार काय?

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : जळगाव येथील समृद्धी केमिकल्स कंपनीत केमीकलच्या गाळात तिन कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी औद्योगिक सुरक्षा अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार की त्यांना मोकळे रान सोडले जाणार असा प्रश्न लोकचर्चेत आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष घालण्याचा सुर जनमानसात आवळला जात आहे.

समृद्धी केमीकल्स मधे केमिकलयुक्त भुमीगत टाकीत स्वच्छता करतांना मयुर सोनार, दिलीप सोनार व रविंद्र कोळी या तिघा जणांचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी तपशिलात शिरता औद्योगिक सुरक्षा यंत्रणेने तिन वर्षापासून या कंपनीत भेटच दिली नाही आणी कामगार सुरक्षा विषयक नियमांची पाहणी व तपासणी केल्याचेही दिसले नाही अशी माहिती बाहेर आल्याचे समजते.

औद्योगिक सुरक्षेअभावी कामगारांचे मृत्यु होत असून संबंधीत यंत्रणेत गेल्या चार ते पाच वर्षापासून एकच झोपे नामक अधिकारी जळगाव अथवा नाशिक येथे ठाण मांडून बसल्याची बाब उघड झाल्याचे समजते. शिवाय औद्योगीक सुरक्षेची ऐसीतैसी करुन हफ्तेखोरीबद्दल लोक आता उघडपणे बोलू लागले आहेत. काही वर्षापुर्वी एका जिल्हाधिकारी महोदयांनी अशाच प्रकारे दुर्लक्ष करणा-या एका अधिका-याला “युजलेस फेलो” अशा शब्दात इतर अधिका-यांसमोर बैठकीत दणकावले होते. आता तिन कामगारांचा जिव गेला आहे. कंपनीचालक तिघांना अटक झाली. मात्र औद्योगिक सुरक्षेचे कर्तव्य बजावण्याऐवजी नाशिकला ठाण मांडून बसणा-या अधिका-यांना आताचे जिल्हाधिकारी मोकळे सोडणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नावर पावत्या फाडू कामगार संघटना गप्प कशा? असा देखील एक प्रश्न चर्चेत आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here