भगत बालाणी, सदाशिव ढेकळे यांच्या शिक्षेला स्थगिती

सुप्रीम कोर्ट

जळगाव : जळगाव नगरपालिकेच्या घरकुल प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेले तत्कालीन नगरसेवक भगत बालाणी व सदाशिव ढेकळे या दोघांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. धुळे जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी 31 ऑगस्ट 2019 रोजी घरकुल प्रकरणी 48 आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. विविध कलमाखाली दोन वर्षापेक्षा अधिकची शिक्षा भगत बालाणी व सदाशिव ढेकळे यांना झाली आहे.

घरकुल प्रकरणात देण्यात आलेल्या शिक्षेच्या निकालास स्थगिती मिळण्याकामी दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज  केला होता. उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती साठी अर्ज केला. न्या. बी.आर. गवई व न्या. संदीप मेहता यांच्या द्विपीठासमोर याप्रकरणी कामकाज पूर्ण होऊन मंगळवारी त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. अँड. प्रवर्तक पाठक व अँड. प्रदीप कुळकर्णी यांनी या प्रकरणी कामकाज पाहिले. घरकुल प्रकरणात याआधी गुलाबराव देवकर, दत्तू कोळी यांच्या शिक्षेला देखील स्थगिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here