गोदावरी हॉस्पीटलमधे गावठी कट्टा आढळल्याने खळबळ

On: May 21, 2021 9:04 PM

जळगाव : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गोदावरी हॉस्पीटलच्या वार्डात असलेल्या बाथरुममधे गावठी कट्टा आढळून आल्याने खळबळ माजली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिस अधिका-यांनी गोदावरी हॉस्पीटलमधे धाव घेतली. याप्रकरणी अद्याप कुणाला अटक केली नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या घटनेने खळबळ माजली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नशिराबाद पोलिस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र साळूंखे व त्यांचे सहकारी तपासकामात गुंतले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment