जळगाव जिल्ह्यात १४ फेब्रुवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

On: February 3, 2026 3:54 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील आगामी राजकीय हालचाली व कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत लागू करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका प्रलंबित आहे. तरी त्या अनुषंगाने जळगाव जिल्हयात ग्रामीण स्तरावर राजकीय हालचालीना वेग आला असून पक्षांतर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याअनुषंगाने  सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.

या आदेशान्वये या कालावधीत शस्त्र, दाहक व स्फोटक पदार्थ बाळगणे, दगडफेक, प्रतिकात्मक दहन, अश्लील वा शांतता भंग करणारी भाषणे-हावभाव तसेच दहन तसेच पोलिस अधिक्षक, जळगाव यांच्या पुर्व परवानगी शिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हा आदेश शासकीय कार्यक्रम, अंत्ययात्रा, लग्न व धार्मिक मिरवणुकांना तसेच कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही. सदर आदेश अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी जारी केले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment