जळगावात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रक्कम चोरी

जळगाव : जळगाव शहरातील जाखनी नगर भागात चोरीची घटना उघड झाली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सोन्या चांदीच्या दागिने व रोख रकमेसह एकुण 65 हजार रुपयांची चोरी झाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सिंधी कॉलनी रस्त्यावरील जाखनी नगर भागातील पायधन हॉस्पीटलसमोर संदीप अशोक गारुंगे हे आपल्या परिवारासह राहतात. संदिप गारुंगे यांच्या वडीलांचे 10 मे रोजी नाशिक येथे निधन झाले. त्यामुळे घराला कुलुप लाऊन गारुंगे पती पत्नी व त्यांची आत्या असे सर्वजण नाशिक येथे अंत्यविधीसाठी गेले होते. या कालावधीत गेटच्या आतील झाडांना पाणी देण्याचे व अंगनातील सफाईचे काम त्यांनी झाडूपोछा करणा-या महिलेला सोपवले होते. दरम्यान आज 22 रोजी नाशिक येथून संदिप गारुंगे यांच्या आत्याने सदर महिलेला विचारपुस करण्यासाठी फोन लावला. त्यावेळी सदर झाडू पोछा करणा-या महिलेने सांगितले की किचनचा दरवाजा उघडा दिसत आहे. घराच्या किचनचा दरवाजा उघडा असल्याचे समजताच संदिप गारुंगे यांच्या आत्याने त्यांची संदीप गारुंगे यांच्या चुलत बहिणीला तात्काळ घराकडे जाऊन पाहणी करण्यास सांगितले.

संदीप गारुंगे यांच्या चुलत बहिणीने घराच्या किचनच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करत पाहणी केली. त्यांना कपाटातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे आढळून आले. या प्रकाराची माहिती मिळताच संदिप गारुंगे आपल्या परिवारासह नाशिक येथून जळगावला आपल्या घरी परत आले. पाहणी दरम्यान त्यांना 25 हजार रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ, 7 हजार रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 5 हजार रुपये किंमतीची 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे सिंगल कानातील टॉप्स, 3 हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैजनची जोडी व 25 हजार रुपये रोख असा एकुण 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीचा रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी व साईनाथ मुंडे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here