गोंदेगावला शिवस्वराज्य दिन उत्साहात

प्रज्वल चव्हाण

गोंदेगाव ता.सोयगाव :- सहा जून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक दिन अर्थात शिवस्वराज्य दिन म्हणून उत्साहात करण्यात आला. ग्रामपंचायत गोंदेगाव ता.सोयगाव जि.औरंगाबाद येथे ग्रामपंचायत कार्यालयात शिव स्वराज्याची गुढी उभारुन, भगवा ध्वज फडकवून शिवस्वराज्य दिवस उत्साहात झाला. यावेळी सरपंच सौ.वनमाला शरद निकम यांच्या हस्ते शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली. उभारण्यात आलेला शिवध्वज शासकीय आदेशात वर्णन केल्याप्रमाणे जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे, या शिवरायांच्या पंच शुभ चिन्हांनी अलंकृत,पंधरा फुट उंचीचा वासा सुवर्ण आणि लाल कापडाची गुडांळी करुन शिवरायांच्या जयघोषात उभारण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

याप्रसंगी मास्क, सोशल डिस्टंस यासह सर्व आवश्यक नियमांचे पालन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ.वनमाला शरद निकम यांच्यासह उपसरपंच दीपक काशिनाथ आहिरे, पोलीस पाटील मनोहर निकम, पी.एम.पाटील, शरद निकम व ग्रामपंचायत सदस्य अतुल बोरसे, गौरव बिंदवाल, दीपक खोडके, विजय सोनवणे, छाया सूर्यवंशी, रेखा पवार, पल्लवी चौधरी,ज्योती नगरे, मनीषा ढाकरे, मंगलबाई अहिरे, हिम्मत कोळी, ग्रामसेवक सुनील राकडे, क्लार्क प्रवीण निकम, संगणक ऑपरेटर जितेंद्र पाटील, शिपाई उत्तम चव्हाण आदी उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here