राष्ट्रपिता गांधींजींच्या पणतीची जेलमधे रवानगी

राष्टपिता महात्मा गांधी यांची पणती आशिष लता राम्गोबिन दक्षिण अफ्रिकेत वास्तव्याला आहे. छपन्न वर्षीय आशिषलता रामगोबिन यांची फसवणूकीच्या गुन्ह्याखाली सात वर्षासाठी जेलमधे रवानगी करण्यात आली आहे. साठ लाख रुपयांच्या फसवणूकीच्या आरोपाखाली डरबनच्या न्यायालयाने सदर शिक्षा सुनावली आहे. सोमवारी सुनावलेल्या या निर्णयानुसार आशिषलता यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पणती असलेल्या आशिषलता यांनी स्वत:ला व्यावसायिक असल्याचे भासवत नफ्याचे आमिष दाखवत एस आर महाराज नावाच्या व्यावसायिकाकडून 62 लाख रुपये घेतले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर एस आर महाराज यांनी स्थानिक न्यायालयात धाव घेत न्यायाची मागणी केली होती. 62 लाख रुपये हडपल्याचा आरोप आशिषलता रामगोबिन यांच्यावर करण्यात आला होता.

एस आर महाराज हे न्यु अफ्रिकेतील अलायंस फुट वेअर डिस्ट्रिब्युटरचे संचालक आहेत. ऑगस्ट 2015 मधे त्यांची आशिषलता समवेत भेट झाली होती. त्यांनी आशिषलता यांना एक कन्साइमेंट इम्पोर्ट आणि कस्टम क्लिअर करण्याच्या मोबदल्यात 62 लाख रुपयांची धनराशी दिली होती. मात्र आशिषलता यांनी कोणतेही कन्साइमेंट केले नव्हते. मिळणा-या नफ्यातून काही वाटा देण्याचे आमिष आशिषलता यांनी एसआर महाराज यांना दिले होते. आशिषलता रामगोबिन या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पणती व प्रसिद्ध मानवाधिकार इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची कन्या आहे. त्यांना डरबन येथील विशेष व्यावसायिक क्राईम न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना शिक्षेविरोधात अपीलात जाण्याची देखील परवानगी नाकारली आहे.

एसआर महाराज यांची कंपनी लिननचे कपडे आणि बुटांची आयात, उत्पादन व विक्री करते. याशिवाय त्यांची कंपनी इतर कंपन्यांना प्रॉफीट शेअरच्या आधारावर पैसे देते. आशिषलता रामगोबिन यांनी एस आर महाराज यांना सांगितले की, त्यांनी दक्षिण अफ्रीकी हॉस्पिटल समुहाच्या नेटकेअरसाठी लिननच्या कपड्यांचे तिन कंटेनर भारतातून मागवले आहेत. आयात आणि सिमाशुल्क अदा करण्यासाठी तसेच बंदरावर माल उतरवण्यासाठी 62 लाख रुपये कमी पडत असल्याचे आशिषलता यांनी एस आर महाराज यांना म्हटले होते. पुरावा म्हणून आशिषलता यांनी महाराज यांना करार व ऑर्डर पावती दाखवली होती. मात्र त्या पावत्या आणि कागदपत्र बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे महाराज यांनी आशिषलता यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here