उद्यापासून सर्वत्र गोल्ड हॉलमार्किंग आवश्यक?

मुंबई : उद्यापासून संपूर्ण देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता ओळखण्यासाठी बीआयएस हॉलमार्किंग आवश्यक करण्यात आले आहे. या नियमाचे प्रारुप गेल्या दिड वर्षापुर्वी तयार करण्यात आले होते. मात्र कोरोना – लॉकडाऊन कालावधीत याची अंमलबजावणी स्थगित करण्यात आली होती. उद्यापासून याची अंमलबजावणी सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. गोल्ड हॉलमार्किंगमुळे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता ठरत असते. सोने व्यावसायिकांना बीआयएसचे मापदंड पूर्ण केल्यानंतरच हॉलमार्किंग मिळते. 14 कॅरेट, 18 कॅरेट व 22 कॅरेट अशी शुद्धता असलेल्या सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्कींग गरजेची असते. ग्राहक त्यांच्याकडे असलेले सोन्याचे दागिने हॉलमार्कींग शिवाय विकू शकतात.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here