घोरपडीचे अवयव विक्रीचा प्रयत्न – तरुणाला अटक

नाशिक : घोरपडीच्या अवयवांची विक्री करणाऱ्या एकाला नाशिकच्या द्वारका परिसरातून अटक करण्यात आली आहे. घोरपडीचे अवयव जवळ बाळगल्याने धनलाभ होत असल्याची अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेतून अनेक जण घोरपडीचे अवयव विकत घेऊन जवळ बाळगतात. अशा अंधश्रद्धाळू लोकांना हेरुन घोरपडीच्या अवयवांची विक्री करणारे घोरपडीची शिकार करत असतात.

घोरपडीचे अवयव विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला नाशिकच्या द्वारका परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याकडून घोरपडीचे हात – पाय व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. घोरपडीचे लिंग अथवा हातांची जोडी जवळ बाळगल्याने धनलाभ होतो असा काही लोकांमधे समज आहे. या समजातून व अंधश्रद्धेतून घोरपडीच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. घोरपडीच्या त्वचेपासून तयार करण्यात आलेले तेल सांधेदुखी, वात विकारांवर उपयोगी असल्याचा देखील दावा केला जातो.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here