दरोड्यातील चौघे एलसीबीकडून अटक

जळगाव : शेंदुर्णी ते पहुर या रस्त्यावर गोंदेगाव नजीक लुटीच्या घटनेप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघा लुटारुंना अटक केली आहे. 30 जून रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास दशरथ बबन बागुल हे त्यांच्या ताब्यातील आयशर वाहनाने क्लिनरसह प्रवास करत होते.

दरम्यान अनोळखी लुटारुंनी रस्त्यात मोटार सायकल आडवी लावत दशरथ बबन बागुल यांना आयशर वाहनासह अडवले होते. त्यांच्या चारचाकी वाहनाचे हेडलाईट फोडून त्यांच्या ताब्यातील सुमारे आठ हजार रुपये रोख व काही चिजवस्तू जबरीने हिसकावून घेतल्या होत्या. तसेच त्यांच्यासह क्लिनरला देखील मारहाण केली होती.

या प्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 238/2021 भा.द.वि. 395, 341, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु होता. पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या निर्देशाखाली त्यांचे सहकारी स.फौ.अशोक महाजन, शरीफ काझी, युनुस शेख किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, पो.हे.कॉ.इंद्रीस पठाण आदींचे पथक पहुर येथे रवाना करण्यात आले होते.

या दरोड्यातील आरोपींना गुन्हा करतांना काही जखमा झाल्या असल्याचे तपास पथकाला समजले. त्या माहितीच्या आधारे जामनेर, पहुर व पाचोरा परिसरातील लहान मोठ्या दवाखान्यातील सीसीटीव्हीचे परिक्षण करण्यात आले. दरम्यान शुभम प्रकाश बारी (20) रा.वाडीदरवाजा, शेदुर्णी, ता.जामनेर, रोशन दत्तात्रय बडगुजर (19) रा.सोयगाव रोड,पाण्याच्या टाकीजवळ, शेंदुर्णी ता.जामनेर, गोरख बापु पाटील (19) रा.वाडी दरवाजा शेदुर्णी ता. जामनेर, अक्षय प्रकाश पाटील (20) रा. संजयदादा नगर, शेदुर्णी ता.जामनेर या चौघां संशयीतांची नावे आणि चेहरे निष्पन्न झाले. त्यांना शिताफीने ताब्यात घेत त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी दरोड्याचा गुन्हा कबुल केला. गुन्हयात वापरलेली मोटार सायकल त्यांनी पोलिस पथकाला काढून दिली. चौघा आरोपींना पुढील तपासकामी पहुर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here