अभिनेत्री हीना पांचाळची न्यायालयीन कोठडीत रवानगी

नाशिक : इगतपुरी येथील रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या ‘बिग बॉस मराठी’ फेम हीना पांचाळसह इतरांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांचे न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश देण्यात आले.

26 जूनच्या मध्यरात्री इगतपुरीती येथील स्काय ताज आणि स्काय लगून या दोन बंगल्यात रेव्ह पार्टी रंगात आली होती. सुरु असलेल्या या पार्टीची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सचिन यांना समजली. माहिती मिळताच पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकला होता. या छाप्यात पंचवीस जणांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने तीन कामगार, एक फोटोग्राफर, एक स्वयंपाकी अशा एकूण 5 जणांचा जामीन मंजूर केला आहे. हीना पांचाळने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही हिंदी सिनेमात काम केले आहे. याशिवाय काही चित्रपटातील आयटम सॉंग मधे देखील सहभाग घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here