जैन इरिगेशनतर्फे शहरात सुरु झाले सर्वेक्षण तीन दिवसात ५५६६ जणांची झाली तपासणी

जळगाव : प्रतिनिधी- कोरोना विषाणू संसर्गाची साखळी रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन करण्यात आला. या काळात जैन इरिगेशन सिस्टिम्स, कांताई नेत्रालय, जैन हेल्थ केअर आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यातर्फे शहरात सर्वेक्षण केले जात आहे. तीन दिवसात १५९६ घरांचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले. तसेच ५५६६ जणांची तपासणी करण्यात आली.

कोरोना सदृश्य लक्षण असलेले रूग्ण शोधण्यासाठी जळगाव महापालिकेच्या सुचनेप्रमाणे सर्वेक्षण केले जात आहे. जैन इरिगेशनचे चाळीस सहकारी घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या शरीराचे तापमान व शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण मोजत आहेत. तसेच कुटुंबात कुणाला ताप, सर्दी, खोकला, दमा, थकवा, हदयविकार, मधुमेह, टिबी अथवा इतर आजारांची माहिती घेतली जात आहे.

सर्वेक्षणात घेतलेली माहिती सायंकाळी जळगाव मनपाला दिली जाते. द्रोपदीनगर, कल्याणीनगर, मुक्ताईनगर, साईनगर, निवृत्तीनगर, हायवे दर्शन कॉलनी, आहुजानगर, कांताई नेत्रालय आदी परिसरात सर्वेक्षण सुरू आहे. नागरिक देखील सर्वेक्षणासाठी पुढे येत आहेत. जैन हेल्थ केअरच्या सहका-यांना थर्मल गन, ऑक्सीमीटर देण्यात आले आहे. यासोबतच सॅनिटायझर, सेफ्टी गॉगल, हॅण्डग्लोज, माक्स, सर्जीकल कोट, फेस शिल्ड सहकाऱ्यांना स्वत:च्या सुरक्षेच्यादृष्टीने पुरविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here