पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाने पोलिस कर्मचा-यांचा गौरव

जळगाव : भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेल्यांचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नेहरु युवा केंद्रातर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ (सन 2019-2020) पुरस्कार तुळजाई बहुउद्देशीय संस्था यांना प्रदान केला.

यावेळी पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. या सन्मानचिन्हाचे मानकरी सहाय्यक फौजदार शिवाजी राजाराम पाटील, सहाय्यक फौजदार लिलाकांत पुंडलिक महाले (जिल्हा विशेष शाखा, जळगाव), पोलीस हवालदार विजय माधव काळे (उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, जळगाव), पोलीस हवालदार शशिकांत बाबुलाल पाटील, पोलीस हवालदार सुनिल पंडीत दामोदरे (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव), पोलीस नाईक महेश रामराव पाटील (पारोळा पोलीस स्टेशन), पोलीस नाईक संदीप श्रावण सावळे, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव आदी ठरले. पोलिस महासंचालकाचे विशेष सेवा पदक – पोलिस शिपाई अतुल अंगद मोरे, पोलीस मुख्यालय, जळगाव यांना देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यंवशी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती गाजरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, तहसीलदार सुरेश थोरात यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, कोरोनायोध्दे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय ‍विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस जळगाव पोलीस दलाच्या पथकाने पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. तर बॅण्ड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरिता खाचणे आणि अपूर्वा वाणी यांनी केले. या कार्यक्रमापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here