डॉ. गंगवाल व त्यांच्या पत्नीविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

औरंगाबाद : जमीन व्यवहारात 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली वाळूज येथील डॉ. अनिल हंसराज गंगवाल यांच्यासह त्यांची पत्नी लता अनिल गंगवाल (दोघे रा. जवाहर हाउसिंग सोसायटी, जवाहर कॉलनी) यांच्याविरोधात वाळूज पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

साजापूर येथील रहिवासी असलेले शेख सुलेमान शेख रुस्तुम यांची पॅराडाइज कन्स्ट्रक्शन या नावाने फर्म आहे. शेख सुलेमान यांनी गेल्या साडेतीन वर्षांपुर्वी डॉ. अनिल गंगवाल व त्यांची पत्नी लता गंगवाल यांच्या नावे असलेली 2 एकर 15 गुंठे जमीन विकत घेण्याची तयारी दाखवली होती. दोन्ही बाजूच्या संमतीने 36 लाख 50 हजार रुपयात हा व्यवहार ठरला होता. त्यानुसार शेख यांनी 15 लाख रुपयांचे दोन आणि साडेसहा लाख रुपयांचा एक असे एकुण 36 लाख 50 हजार रुपयांचे चेक डॉ. गंगवाल यांना कबुल केले. तसेच 20 लाख रुपयांचा चेक शेख यांनी डॉ. गंगवाल यांना आगावू दिला व त्यानंतर 36 लाख रुपयांचे चेक देत शेख यांनी खरेदीखत तयार केले.

डॉ. गंगवाल यांनी 15 लाख व साडेसहा लाख रुपयांचा चेक वटवून घेतला व नंतर 15 लाख रुपये ६ लाख ५० हजारांचा धनादेश वटवून घेतला. नंतर १५ लाख रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून बँकेत जमा करण्यास शेख यांना डॉ. गंगवाल यांनी म्हटले. त्यानुसार 15 लाख रुपये डॉ. गंगवाल यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर व्यवहाराची पुर्तता झाली.

त्यानंतर हमी म्हणून दिलेला 20 आणि 15 लाख रुपयांचा चेक परत मिळण्याची विनंती शेख यांनी डॉ. गंगवाल यांचेकडे केली. डॉ. गंगवाल दांपत्याने सदर चेक देण्यास टाळाटाळ सुरु केली. हे दोन्ही चेक देखील डॉ. गंगवाल यांनी बॅंकेत जमा केले. मात्र सदर चेक न वटण्यासाठी शेख यांनी बॅंकेला कळवले होते. आपली फसवणूक होत असल्याचे समजल्याने शेख यांनी याप्रकरणी गंगापूर न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार डॉ. गंगवाल व त्यांची पत्नी अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here