जळगाव जिल्ह्यातील प्रभारी पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश

जळगाव – जळगाव जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेतलेल्या निर्णयानुसार तसेच पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या स्वाक्षरीने जिल्ह्यातील प्रभारी पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या अधिका-यांची नावे व सध्याच्या नेमणूकीचे ठिकाण पुढीलप्रमाणे असून बदलीचे ठिकाण कंसात दर्शवलेले आहे.

पो.नि.विठ्ठल ससे – शनीपेठ पो.स्टे. (पो.नि.सुरक्षा शाखा प्रभारी – कार्यभार डीवायएसपी मुख्यालय), बाबासाहेब ठोंबे – भुसावळ शहर (जिल्हा विशेष शाखा प्रभारी), रामकृष्ण महादू कुंभार – भुसावळ तालुका पो.स्टे. (जळगाव तालुका पो.स्टे.प्रभारी), रामदास वाकोडे – रावेर (जिल्हापेठ पोलिस स्टेशन), विजयकुमार ठाकुरवाड -चाळीसगाव शहर पो.स्टे.(जळगाव शहर), प्रताप इंगळे – जामनेर (भुसावळ शहर), देवीदास कुनगर – जळगाव शहर वाहतुक शाखा (चोपडा ग्रामीण), किरण शिंदे – नियंत्रण कक्ष (जामनेर), कैलास नागरे – बुलढाणा येथून हजर (रावेर), विजय फकीरराव शिंदे – बीडीडीएस नाशिक येथून हजर (रामानंद नगर पो.स्टे.), शंकर विठ्ठल शेळके – लाप्रमी वाशिम येथून हजर (धरणगाव पो.स्टे.), कांतीलाल काशिनाथ पाटील – चाळीसगाव शहर – नाशिक ग्रामीण येथून हजर (चाळीसगाव शहर), अंबादास मोरे – धरणगाव (मानव संसाधन विभाग जळगाव), विलास शेंडे – जिल्हापेठ जळगाव (भुसावळ तालुका पो.स्टे.), दिलीप मांगो पाटील – पो.नि.सुरक्षा शाखा जळगाव (नियंत्रण कक्ष जळगाव), लिलाधर कानडे – नियंत्रण कक्ष (शहर वाहतुक शाखा जळगाव), बळीराम हिरे – सायबर पो.स्टे. (शनीपेठ पो.स्टे.), संतोष भंडारे –  नियंत्रण कक्ष जळगाव तैनात पारोळा पारोळा (पारोळा पो.स्टे.), अरुण धनवडे – मानव संसाधान विभाग जळगाव (पहुर पो.स्टे.), अनिल मोरे – बाजारपेठ पो.स्टे.भुसावळ (नशिराबाद पो.स्टे.), सिद्धेश्वर आखेगावकर – स्थानिक गुन्हे शाखा तैनात वाचक 1 (फैजपूर पो.स्टे.), निता कायटे – पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे. (कासोदा पो.स्टे.), कृष्णा भोये – बाजारपेठ पो.स्टे.भुसावळ (पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.), जयेश खलाणे – एमआयडीसी पो.स्टे.तैनात वाचक (मारवड पो.स्टे.), स्वप्निल नाईक – पहुर पो.स्टे.(शहर वाहतुक शाखा भुसावळ), आशिषकुमार अडसुळ – नाशिक ग्रामीण येथून हजर (वरणगाव पो.स्टे.)

जळगाव शहर वाहतुक शाखेचे पो.नि.देविदास कुनगर यांची चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला बदली झाली आहे. त्यांच्या बदलीमुळे सहायक पोलिस निरिक्षक कैलाससिंग पाटील यांच्यासह सर्व कर्मचा-यांच्या वतीने त्यांना सन्मानपुर्वक निरोप देण्यात आला. याप्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक कैलाससिंग पाटील, हे.कॉ.राजेंद्र उगले यांच्यासह इतर कर्मचा-यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पो.नि.देवीदास कुनगर यांना बदलीच्या जागी हजर होण्याकामी तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here