ज्यांनी लावली ईडी, त्यांची निघेना सीडी !—— जिल्हा बॅंक लुटण्या, मतलबी लाडीगोडी ?

जळगाव जिल्ह्यातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतपेढीच्या सध्या गाजत असलेल्या सुमारे 1200 ते 20 हजार कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारातून माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे कथित इष्टमित्र सुनिल झवर याने पोलीसांना सहा महिने हुलकावणी दिली. त्यानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात येऊन झंवरच्या कार्यालयावर छापे टाकले.

या छाप्यात अनेक आजी माजी मंत्री – आमदार – खासदार यांची कोरी लेटरहेड्स, शिक्के, वॉटरग्रेस कंपनीशी संबंधीत दस्तावेज सापडले. जिल्ह्याचे माजी भाजप नेते, भाजपचे माजी मंत्री नाथाभाऊ  खडसे यांनी उठवलेला आवाज यामुळे जळगाव जिल्हा चांगलाच गाजला. विशेष म्हणजे भाजपात असतांना मंत्रीपदावरुन डावलले गेल्याने नाथाभाऊ – गिरीशभाऊ यांचे आपसी संबंध ताणले गेले. शिवाय जिल्हा वर्चस्वाचा मुद्दा होताच.

बीएचआर प्रकरणावरुन हवा तापल्याचे दिसताच काही राजकीय नेत्यांनी बचावाचा पवित्रा घेतला. सुनिल झंवर प्रकरणापासून शक्यतो चार हात दूर राहणे, हात झटकणे असेही काहींनी सुरक्षीत अंतर राखले. परंतू असे केल्याने खोटेपणा उघड होऊ शकतो हे लक्षात येताच “त्या सुनिल झवर” सोबत सर्वांचेच मैत्रीचे संबंध असे सांगत गिरीश भाऊंसकट सर्वांनी हात झटकले. पाळधीच्या भाऊंनी देखील “झवर आमचे मित्र” अशी प्रतिक्रिया नोंदवली होती.

एकीकडे जिल्ह्यातील दोन माजी मंत्र्यांमधील परस्परांना ईडी – सीडी लाऊन संपवण्याची भाषा युद्धजनक वळणावर आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे नाथाभाऊंच्या प्रवेशानंतर स्वत: भाऊंनी सीडी लावण्याचे प्रती आव्हान दिल्याने राज्यभर त्या सीडीची जोरदार चर्चा रंगली. मध्येच पहुरच्या लोढा यांनी आव्हानबाजी केली. त्याच कथित सीडी किंवा छायाचित्रणासाठी मुंबईत खासगी धाडसत्र राबवल्याची तक्रारही झाली. परंतू ती कथीत सीडी बाहेर आलीच नाही. कोण कशी सीडी दाखवतो तेच बघू अशी आव्हानबाजी झाली.

या टोकाच्या भांडणात फायदा किती – नुकसान किती? याची गणीते –त्रेराशिके मांडण्यात आली. दोघांच्या भांडणातून काहींनी स्वार्थ शोधला. तर नेहमी प्रमाणे “मांडवली” करुन फायदा उपटता येतो काय? या हिशेबाने मंडळी कामाला लागली. त्यासाठी इष्टमित्र, छुपे शत्रु, हितचिंतक, कार्यकर्ते, जातीपातीची वजनदार मंडळी यांची मदत घेतली जाते हेच या प्रकरणात दिसले.

एकीकडे दोन भाऊंमधे युद्धज्वर तापला असतांनाच काही महिन्यांनी होऊ घातलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीचे निमीत्त करुन ही सुमारे दोन ते चार हजार कोटी रुपयांच्या उलाढालीची सोन्याची अंडी देणारी कोंबडी आपल्याच टोपल्याखाली असावी यासाठी सर्वपक्षीय नेहमीच्या “मिलबाटके” फॉर्म्युल्याची टूम निघाली. त्यासाठी पाळधीचे भाऊ मध्यस्तीसाठी पुढे सरसावले. सेना-भाजपाच्या आमदारांनी नाथाभाऊ खडसेंच्या भेटीगाठी घेतल्या. सर्वपक्षीय पॅनलसाठी गिरीशभाऊ तयार असल्याचा एक संदेश सोशल मिडीयावर झळकला. जिल्हा सहकारी बॅंकेची गुळाची ढेप दाखवून सीडी भंगारात फेकली तर उत्तमच हा कदाचीत हिशेब असावा. जळगाव जिल्ह्यात राजकीय पक्ष नेत्यांच्या या हालचालींचा सुगावा श्रेष्ठींना लागला असावा. तरी देखील ज्यांनी ईडी लावली त्यांची सीडी दाखवण्याचा पुर्वघोषीत कार्यक्रम “डस्टबीन” मधे टाकण्याचा उपक्रम होण्यापुर्वीच जळगाव जिल्ह्याचे नेते नाथाभाऊ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्याची बातमी न्युज चॅनलवर झळकली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात बोलले जाते की राजकारण्यांच्या दोस्ती दुष्मनी भांडणाच काही खरे नाही. ज्यांनी ईडी लावली त्यांचेशी जिल्हा बॅंकेच्या सत्तेसाठी का व्हावी लाडीगोडी?

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here