पहिला पती असतांनाच दुस-यासोबत केले पलायन!- जमीन हडपण्यासाठी सागरीबाईने घडवले रामायण!!

काल्पनिक छायाचित्र

जळगाव – प्रताप खुमसिंग भिल आणि सागरीबाई हे दोघे पती पत्नी होते. दोघांचा संसार व्यवस्थीत सुरु होता. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवरील सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या मध्यप्रदेशातील बुरहानपुर तालुक्यातील बसाली या गावी प्रताप रहात होता. प्रताप भिल याचे आईवडील व भाऊ असे सर्वजण मयत झाले होते. त्यामुळे दाखल केलेल्या वनदाव्याखाली प्रताप भिल यास विस एकर शेतजमीन मिळाली होती. तो विस एकर शेतजमीनीचा मालक झाला होता. एकंदरीत प्रताप व सागरीबाई यांचे सर्वकाही व्यवस्थित सुरु होते.

असे असले तरी त्याची पत्नी सागरीबाई शंभर एकर जमीन मालकाच्या प्रेमात पडली. लक्ष्मण वेरसिंग भिल असे त्या शंभर एकर शेतजमीन मालकाचे नाव होते. जमीनदार लक्ष्मण भिल हा विवाहीत होता. तरीदेखील सागरीबाई त्याच्या प्रेमात पडली. ती त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा बाळगून होती. पहिली पत्नी असतांना देखील मध्यप्रदेशातील नेपानगर तालुक्यातील जमीनदार लक्ष्मण भिल याने सागरीबाईच्या प्रेमाचा स्विकार केला. त्याने सागरीबाईला तिचा पती प्रतापच्या रखवालीतून पळवून आणले. त्यानंतर दोघे पती पत्नीसारखे राहू लागले. दोघांनी एकमेकांसोबत लग्न केले. बघता बघता तिन वर्षाचा कालावधी लोटला.

सागरीबाईचा लक्ष्मण भिल याच्यासोबत दुसरा संसार सुरु झाला होता. लक्ष्मण भिल याचा  देखील सागरीबाईसोबत दुसरा विवाह होता.  विस एकर शेतमालकापेक्षा सागरीबाईला शंभर एकर जमीनदार जवळचा वाटला होता. पत्नी सागरीबाई लक्ष्मणसोबत पळून गेल्यामुळे प्रताप एकाकी पडला होता. सागरीबाई आणि लक्ष्मण या दोघांवर प्रतापचा राग होता. सागरीबाई चांगलीच हुशार होती. ती लक्ष्मणसोबत दुसरा विवाह करुन संसार करत होती. मात्र तरी देखील तिने पुर्वाश्रमीचा पती असलेल्या प्रतापची पत्नी असल्याचा हक्क कायम ठेवला होता. त्याच्या विस एकर शेतजमीनीवर तिची नजर होती. पहिला आणि दुसरा अशा दोघा पतींच्या शेतजमीनीची ती मालकीन होऊ इच्छीत होती. दुसरा पती, लक्ष्मणची तिला साथ लाभली होती. पहिली पत्नी असतांना देखील लक्ष्मण सागरीबाईचा सांभाळ करत होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली ती पहिल्या पतीची विस एकर शेतजमीन हडपण्याच्या विचारात होती.

प्रतापचा कायमचा काटा काढल्यानंतर त्याची शेतजमीन आपल्या मालकीची होईल हा कुविचार तिच्या व लक्ष्मणच्या मनात सुरु होता. त्या दृष्टीने सागरीबाई, लक्ष्मण व त्याचे नातेवाईक साथीदार प्रतापला ठार करण्याचे नियोजन करत होते. त्या नियोजनानुसार पाडळा शेतशिवारात एकटा सापडलेल्या प्रतापला संगनमताने लक्ष्मण वेरसिंग भिल, सागरीबाई लक्ष्मण भिल, झिंगला शहादा भिल, इस्माईल हसन तडवी, महेबुब कासम तडवी यांनी बांबू काठ्यांनी डोक्यावर बेदम मारहाण सुरु केली. त्यानंतर झिंगला शहादा भिल (रा. भसाली बोरी ता जि.बुऱ्हाणपूर) याने प्रतापचा गळा ठिबकच्या नळ्यांनी घट्ट आवळून त्यास अमानुषपणे ठार केले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने प्रतापचा मृतदेह विहीरीत टाकून दिला.

काही दिवसांनी प्रतापचा मृतदेह विहीरीतील पाण्यात फुगून वर आला. मृतदेह विहीरीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे बघून टाल्या शहादा भिल व जितेंद्र सुरमल भिल आणि सुरमल छत्तरसिंग भिल यांनी प्रतापचा मृतदेह विहीरीच्या पाण्यातून बाहेर काढला. मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी नागोरी नदीच्या नाल्याकाठी त्याला पुरले.

प्रताप घरी परत आला नाही म्हणून त्याचे नातेवाईक हवालदिल झाले होते. त्यांनी त्याची काही दिवस वाट पाहिली मात्र तो घरी आलाच नाही. त्याचा शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे 20 ऑगस्ट रोजी तो हरवल्याबाबत रावेर पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली. सदर मिसींग रावेर पोलिस स्टेशनला 36/21 या क्रमांकाने नोंद करण्यात आली. . मिसींग दाखल झाल्यानंतर पो.नि. रामदास वाकोडे यांनी विविध पथके तयार करत त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. खब-यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांचा लक्ष्मण वेरसिंग भिल व सागरीबाई भिल यांच्यावर संशय होता. पोलिसांच्या दृष्टीने बेपत्ता प्रतापच्या पत्नीला लक्ष्मण भिल याने पळवून आणले होते व तिच्यासोबत संसार देखील थाटला होता.

पोलिसांनी लक्ष्मण वेरसिंग भिल व सागरीबाई भिल या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर क्रमाक्रमाने तपासात इस्माईल हसन तडवी, मेहबूब कासम तडवी, टाल्या शहादा भील, जितेंद्र सुरमल भील, सुरमल छत्तरसिंग भील अशा एकुण सात संशयीतांना पाडळे व बुजुर्ग बुरहानपुर येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न.  288/2021 भा.द.वि. 302, 201, 34 नुसार दाखल करण्यात आला.

मयत प्रताप यास पुरलेल्या जागेतून बाहेर काढण्यात आले. नातेवाईकांनी मयत प्रतापची ओळख पटवली. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या उपस्थितीत जागेवरच पंचनामा आणि शवविच्छेदन पुर्ण करण्यात आले. अटकेतील सर्व सातही संशयीत आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याच्या तपासकामी रावेर पोलिस स्टेशनचे सपोनि शितलकुमार नाईक, पीएसआय मनोहर जाधव, मनोज वाघमारे, सहायक फौजदार राजेंद्र करोडपती, हे.कॉ. बिजू फत्तु जावरे, पोलिस नाईक जगदीश पाटील, पो.ना. महेंद्र सुरवाडे, पो.ना. नितीन डांबरे, पो. कॉ. सुरेश मेढे, पो. कॉ. प्रमोद पाटील, पो.कॉ. प्रदीप सपकाळे, पो.कॉ.सचिन घुगे,पो. कॉ. मनोज मस्के, पो. कॉ. सुकेश तडवी, हे.कॉ. गोपाळ पाटील, पो.ना. संजय मेढे, पो.कॉ. उमेश नरवाडे,पो. कॉ. श्रीराम कांगणे,पो. कॉ. कल्पेश आमोदकर, पो. कॉ. विशाल पाटील  आदींनी तपासकामी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here