पेट्रोल – डिझेलच्या किमतीत पन्नास टक्के घसरणीची शक्यता

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या असून सर्वसामान्य जनता कमालीची त्रस्त झाली आहे. मात्र या किमतीत जवळपास पन्नास टक्के घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जीएसटीवर सिंगल नॅशनल रेट अंतर्गत पेट्रोलियम उत्पादनांवर टॅक्स लागू करण्या संदर्भात मंत्र्यांचे पॅनल विचारविनीमय करणार आहे. कंज्यूमर प्राईस आणि सरकारी महसूलातील संभाव्य बदलांसाठी महत्वपुर्ण पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. लखनऊमध्ये होणार्‍या 45 व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाण्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेले पॅनल याबाबतीत विचार करेल.

जीएसटी सिस्टममध्ये बदल करण्यासाठी पॅनलच्या तीन-चथुर्तांश संमतीची आवश्यकता असते. यात सर्व राज्य आणि प्रदेशांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here