सोन्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांची पावले सराफ बाजाराकडे

जळगाव – सध्या सोन्याचे भाव घसरत असल्याचे दिसुन आले आहे. कोरोना संकट काळात सोन्याचे भाव पन्नास हजाराच्या जवळपास गेले होते. सध्या सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम पन्नास हजाराच्या आत आहेत कालच्या सोने व चांदीच्या दराच्या तुलनेत आज सोने व चांदीचे दर कमी झाले आहेत. आज सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम जीएसटीसह 48500 एवढे आहेत. एकुणच सध्या सोन्याचे दर किफायतशीर असल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून आले आहे. जळगावचे सुवर्ण व्यापारी स्वरुपकुमार लुंकड यांनी सोने खरेदी व गुंतवणूकीसाठी ही योग्य वेळ असल्याचे म्हटले आहे. घर, जागा खरेदी केल्यानंतर अर्थ व्यवस्थेत होणारी तेजी मंदी, जमीन घोटाळे या घटकांचा विचार करता कित्येकांना सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर वाटते. असे असले तरी एकाच ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा काही प्रमाणात सोन्यात तर काही प्रमाणात इतर ठिकाणी देखील गुंतवणूक करणे योग्य असते.

बाजार कोसळला अथवा पुर्ववत झाला तरी सोन्याचा दर वाढतो अथवा निदान स्थिर तरी राहतो. त्यामुळे सोने गुंतवणूकीत जोखीम कमी असल्याचे गुंतवणूक तज्ञ सांगतात. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लग्नातील खर्चावर निर्बंध आले. लग्नाचा खर्च कमी झाल्यामुळे पैशांची एक प्रकारे बचत झाली. त्या बचतीतून सोने खरेदीकडे अनेकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. पारंपारिक सोने खरेदीसह सोन्याची नाणी, कॅडबरी यामधे देखील गुंतवणूक केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here