पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली तिन मजली इमारत

jain-advt

जळगाव – पाचोरा शहरातील तिन मजली इमारत 20 सप्टेबरच्या रात्री पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. बांधकाम करतांना या इमारतीमधे काही तांत्रीक दोष राहिले होते असे म्हटले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात सदर इमारत होती. मुंबई स्थित साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा शहरात गुंतवणूक म्हणून सदर तिन मजली इमारत गेल्या पाच वर्षापुर्वी बांधली होती. मात्र तांत्रिक दोष असल्यामुळे या इमारतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले होते. संभाव्य धोका लक्षात घेत भाडेक-यांनी सदर इमारत अगोदरच रिकामी करुन घेतली होती.

20 सप्टेबरच्या रात्री सुरु असलेल्या रिमझीम पावसामुळे ही इमारत अखेर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. घटनास्थळी पाचोरा तालुका कॉग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भेट देत नागरीकांना धिर देत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here