बनावट इंजेक्शनचा पुरवठा एफडीआयने केला पर्दाफाश

काल्पनिक छायाचित्र

अहमदाबाद – कोरोना विषाणूसोबत लढा देण्यासाठी देशातील डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र या संधीचा काही जण गैर फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. या वृत्तीमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे. गुजरात राज्याच्या सूरत येथील एका घटनेतूनथून हा प्रकार उघड झाला आहे.

गांधीनगर येथून आलेल्या एफडीआयच्या पथकाने कोरोना उपचारासाठी खोट्या इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एफडीआयने या प्रकरणी पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. ही टोळी कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या टोसिलिजूमॅब या इंजेक्शनच्या नावे नकली इंजेक्शनचे वितरण करत होती.

या टोळीकडून मोठ्या प्रमाणात टोसिलिजुमॅबची नकली इंजेक्शन जप्त केली आहेत. या इंजेक्शनची अंदाजे किंमत जवळपास ८ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. अहमदाबादच्या संजीवनी रुग्णालयातील एका डॉक्टरला रुग्णावरील उपचारादरम्यान शंका आली.

एका मेडिकल दुकानदाराने बिल न घेता १ लाख ३५ हजार रुपयांची ही इंजेक्शन घेतल्याचा प्रकार देखील दरम्यानच्या काळात उघड झाला. ही सर्व इंजेक्शन सुरत येथील सोहेल इस्माइल या व्यक्तीकडून खरेदी करण्यात आली होती.

रुग्णांच्या जीविताशी खेळल्या जाणा-या या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला. एफडीआयच्या कारवाईनंतर सोलेह इस्माइल, नीलेश लालीवाला, अक्षय शाह, हर्ष ठाकोर आणि आशिष शाह अशा पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here