गुंगीचे औषध पाजून विवाहीतेवर अत्याचार

काल्पनिक छायाचित्र

यवतमाळ : विवाहितेला गुंगीचे औषध पाजून तिचे विवस्त्रावस्थेत फोटो काढून त्या फोटोच्या धाकावर तरुणाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. काढलेले फोटो विवाहितेच्या पतीला दाखवण्याची धमकी देत विविध ठिकाणी अत्याचार केल्याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन अवधुतवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल शेंडे असे अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तरुणाचे नाव आहे.

अवधुतवाडी पोलिस स्टेशन हद्दीत राहणा-या विवाहित महिलेची विशाल शेंडेसोबत सन 2011 मधे परिचय झाला होता. या ओळखीचा फायदा घेत त्याने सन 2013 मधे विवाहितेला आपल्या घरी बोलावले. त्यावेळी त्याने चहामधे गुंगीचे औषध टाकले होते. त्यामुळे बेशुद्ध झालेल्या विवाहितेचे विवस्त्रावस्थेत फोटो काढले. त्या फोटोच्या आधारे त्याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार क्वेले. तसेच सदर फोटो पतीला दाखवण्याची धमकी देत विविध ठिकाणी अत्याचार केला. या प्रकरणी सदर विवाहितेने अवधुत वाडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मनोज केदारे पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here