विना परवाना देशी दारु विक्रेता पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : विना पास परवाना चोरट्या पद्धतीने देशी दारुच्या बाटल्या विकणा-या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आज सायंकाळी कारवाई केली. आकाश तंवर असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. कुसुंबा गावात एका पान टपरीच्या आडोशाला बसून तो बेकायदा दारु विकतांना आढळून आला. त्याच्या ताब्यातून पंधराशे रुपये किमतीच्या टॅंगो पंच देशी दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

पो.कॉ. सिद्धेश्वर डापकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मु.पो.अँक्ट कलम 65(ई) नुसार करण्यात आलेल्या या कारवाईत पो.हे.कॉ. गफ्फार तडवी, पोकॉ. शांताराम पाटील, होमगार्ड धिरज भगत आदींनी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here