बडतर्फ पोलीस शैलेश जगतापसह इतरांवर आणखी दोन गुन्हे दाखल

घरफोडी

पुणे : विक्री झालेल्या जमिनीच्या व्यवहारापोटी २० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगतापसह तिघांवर खडक पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे. शैलेश जगताप यांच्यावर आतापावेतो कोथरुड, समर्थ, खडक व हडपसर अशा एकुण चार पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले आहेत.

शैलेश जगताप, प्रकाश फाले (सांगवी) व मिना कंजारी (पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सत्यभामा पोपट चांदगुडे (४०) रा. चिखली यांनी खडक पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नोव्हेंबर २०१५ मध्ये तहसीलदार कार्यालयात घडली होती.

शैलेश जगताप, देवेंद्र जैन, रवींद्र बऱ्हाटे यांच्यावर कोथरुड, समर्थ पोलीस स्टेशनला फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़. सध्या समर्थ पोलिसांनी जैन, जगताप यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मिना कंजारी यांनी उंड्री येथील जागा सन २०१२ मध्ये विकली होती. तरीही त्यांनी दोन गुंठे जागा विकायची असल्याचे सांगितले. त्यासाठी शैलेश जगताप व प्रकाश फाले यांच्या मध्यस्थीतून हा व्यवहार करण्यात आला. तसेच औंध येथील जमिनीच्या व्यवहारात सत्यभामा चांदगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून आरोपींनी २० लाख रुपये घेतले.

यातील १ लाख रुपयांची इसार पावती तहसीलदार कार्यालयात करण्यात आली होती. परंतु, चांदगुडे यांना ही जागा अगोदरच विकली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी रक्कम परत मागितली. त्यावेळी शैलेश जगताप यांनी रक्कम परत मागितल्यास खोट्या गुन्हयात अडकविण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरुन आपण गप्प बसल्याचे चांदगुडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, हडपसर पोलीस स्टेशनला प्रकाश फाले, त्याची पत्नी सविता फाले, शैलेश जगताप, पुतण्या जयेश जगताप, परवेश जमादार, यश फाले, अ‍ॅड़ विजय काळे, माहिती अधिकार कार्यकर्ते रवी बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन, विनय मुंदडा, मुकेश पौडवाल यांच्या विरोधात अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कैलास शिवाजी शिरसाठ (३०) काळेपडळ, हडपसर यांनी हडपसर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना सन २०१७ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत घडली. प्रकाश फाले व इतरांनी कोथरुड, औंध, सेनापती बापट मार्गावरील जागा खरेदीत पैसे गुंतवल्यास दामदुप्पट फायदा होईल असे आमिष दाखवत शिरसाठी यांच्याकडून दहा लाख व त्यांचे मेहुणे विलास नेवगे यांच्याकडून २० लाख रुपये असे एकुण ३० लाख रुपये घेतले.

आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर रक्कम परत मागितली. त्यावर जगताप यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविला. अ‍ॅड. विजय काळे यांनी त्यांच्याशी संगनमत करत तुमचे पैसे बुडणार नाही, अशी ग्वाही देत दिशाभूल करत फसवणूक केली़. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भाबड पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here