कुऱ्हाडीचे घाव घालत पत्नीची हत्या

दौलताबाद : घरगुती वादातून पतीने पत्नीची कु-हाडीचे घाव घालत हत्या व नंतर विहीरीत उडी घेत स्वत:चे जीवन संपवण्याची घटना रविवारी उघडकीस आली. गंगापूर तालुक्यातील टाकळीची वाडी येथे घडलेल्य्ला घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चंपालाल तान्हसिंग बिघोत असे आत्महत्या केलेल्या पतीचे व गंगाबाई चंपालाल बिघोत असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे.

पहाटे तीन वाजेच्या सुमारास चंपालाल यांनी घरात मुलगा झोपलेल्या खोलीचा दरवाजा अगोदर बंद करुन घेतला. त्यानंतर पत्नीची कु-हाडीने हत्या केली. जीवाच्या आकांताने आक्रोश करणा-या आईचा आवाज आल्यानंतर मुलगा राहुल यास जाग आली. मात्र दरवाजा अगोदरच बाहेरुन बंद करुन ठेवल्याने त्याला बाहेर येणे शक्य झाले नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here