व्हाइटनर न दिल्याने तरुणाची हत्या

crimeduniya
[email protected]

नाशिक : नशेसाठी व्हाईटनरचा वापर केला जात असल्याचे अनेक घटनांमधून उघड होत असते. अशाच एका प्रसंगात व्हाईटनरमुळे झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाली आहे. व्हाईटनर न देणा-या मित्राची त्याच्याच मित्राने हत्या केल्याची घटना नाशिकच्या भद्रकाली येथे उघड झाली आहे. 18 ऑक्टोबरच्या रात्री आठ वाजता घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन गायकवाड (25) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून संशयीत आरोपी असलेला तरुण फरार झाला आहे. नाशिकच्या दूधबाजारात रात्रीच्या वेळी व्हाइटनरची नशा करण्यासाठी दोघा तरुणांमधे वाद झाला. संशयीत तरुणाने नितीन गायकवाड यास नशा करण्यासाठी व्हाईटनरची मागणी केली. मात्र मयत नितीन गायकवाड याने त्याला व्हाईटनर दिले नाही. रागाच्या भरात संशयीत तरुणाने नितीन यास चाकूने भोसकले.

चाकूच्या घावात पोटातून कोथळा बाहेर निघाल्याने नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला. दरम्यान हल्ला करणारा संशयीत पसार झाला. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांना नितीन गायकवाड यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याची जीवनयात्रा संपुष्टात आली. सदर घटना परिसरातील एका सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या आधारे पोलिस तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here