पंख्याच्या पात्याने गळा चिरुन भावाची हत्या

पुणे : बाहेरख्यालीचा नाद जडलेल्या भावाच्या सतत पैशाच्या मागणीला वैतागून मोठ्या भावाने लहान भावाची पंख्याच्या पात्याने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हडपसर येथील 15 नंबर चौकातील चाळीत घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. बाबू उर्फ प्रदीप शिवाजी गवळी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन श्रीरंग बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारेकरी भाऊ मनोज शिवाजी गवळी याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

मयत प्रदीप रिक्षा चालवत होता तर मनोज हा ट्रॅव्हल्सच्या गाड्या सोडण्याचे काम करुन आपला उदरनिर्वाह करत होता. प्रदिप मुळे मनोज व त्याच्या पत्नीत वाद होत असत. मनोजची पत्नी गावाला गेली असतांना त्याने लहान भाऊ प्रदिप यास पंख्याच्या पात्याने गळा आवळून त्याची हत्या केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here