अवैध रेती वाहतुक करणारे अटकेत

गोंदीया (अनमोल पटले) : अवैधरित्या रेतीची तस्करी करणा-या तिघांना वन कर्मचा-यांनी अटक केली आहे. 20 ऑक्टोबरच्या रात्री सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी अंतर्गत येणार्‍या सहवनक्षेत्र सहाय्यक शेंडा परिसरातील सालेधारणीजवळ रेतीची वाहतुक करणा-या ट्रॅक्टरचा पाठलाग करत शिताफीने तिघांवर अटकेची कारवाई केली.

पवन खेमराज बागडे (23), कैलास शामराव मडावी (39), नरेंद्र शामराव मडावी (46) सर्व रा. सालेधारणी अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. शेंडाचे वनरक्षक नरेशकुमार पातोडे व क्षेत्रसहाय्यक फिरोज पठान आणि वन कर्मचार्‍यांनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील तिघांवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33, 32 (फ) 33 (1) (ब) 41, 42व 52 अन्वये गुन्हा दाखल करण्यात अलाअ आहे. सडक अर्जुनी प्रथम श्रेणी न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शेंडाचे क्षेत्र सहायक फिरोज पठाण, वनरक्षक नरेशकुमार पातोडे, डी. डी. माहुरे, विनोद आडे, संजय चव्हाण, वनमजुर नाजुक मेंढे, हिवराज ईळपाते यांनी कारवाई केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here