शेतकरी हिताला प्राधान्य – खा. प्रफुल पटेल

गोंदीया (अनमोल पटले) : कोरोना कालावधीत राज्य सरकार आर्थिक संकटात होते. मात्र शेतकरी हित लक्षात घेत सलग दोन वर्ष त्यांच्या धान्याला बोनस देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण केले आहे. भारतातील कोणत्याही राज्यात रब्बी हंगामातील पिकांची खरेदी होत नाही मात्र शेतकर्‍यांचे हित लक्षात घेत आमच्या प्रयत्नांमुळे केवळ महाराष्ट्रात खरेदी होत आहे. भंडारा व गोंदीया जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढवण्यासाठी नेहमी सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

लाखांदूर तालुक्यातील चिंचोली /अंतरगाव येथे खा. प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत रा.कॉ. पक्षाच्या वतीने नागरी सत्कार व कार्यकर्ता मेळावा उत्साहात झाला. यावेळी खा. पटेल बोलत होते. याप्रसंगी अनेकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. पुढे बोलतांना खा. पटेल म्हणाले की कोरोना कालावधीत जनतेची गैरसोय होवू नये यासाठी आँक्सीजनचा पुरवठा करणे, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होवू नये यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आहे. सर्व नागरिक, कार्यकर्ता व पदाधिका-यांना दिपावलीच्या शुभेच्छा खा. पटेल यांनी यावेळी दिल्या.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here