बॉलिवूडचा कंट्रोल ठराविक लोकांकडे ; गोविंदाचा आरोप

Govinda

मुंबई : नव्वदच्या दशकात बॉलीवूडमधील चमकता सितारा गोविंदाने बॉलीवूडमधील काही लोकांवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. बॉलीवूडचा कंट्रोल काही ठराविक समुहाकडे असल्याचा त्याचा आरोप आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील लॉबिंगबाबत कंगना रानावतने आरोप केला होता. त्यानंतर अनेक दिग्दर्शक, अभिनेत्यांनी बॉलिवूडच्या विशिष्ट समुहावर गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये आता गोविंदाची देखील भर पडली आहे. 

गोविंदाने बॉलिवूडमधील नेपोटिझमवर म्हटले की, त्याचे आई वडील कलाकार असले तरी देखील आपल्याला जम बसवण्यासाठी कसरत करावी लागली. प्रोड्यूसर्सची भेट घेण्यासाठी आपल्याला कित्येक तास वाट बघावी लागली. बॉलीवूडमध्ये गट आहेत. ते गट काही चार ते पाच लोक चालवत असल्याचा त्याने आरोप केला आहे.

पुर्वी ज्याच्या अंगी गुणवत्ता होती त्याला काम मिळत होते. मात्र आता काही ठराविक लोक सिनेमाचा व्यापार चालवतात. सिनेमा केव्हा रिलीज करायचा हे देखील तेच ठरवतात. गोविंदाची मुलगी टीना आहूजा बॉलिवूडमध्ये पदार्पन करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here