प्रेयसीच्या घरातच प्रियकराने केली चोरी

औरंगाबाद : लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीच्या घरात प्रियकरानेच चोरी केल्याचा प्रकार जिन्सी पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. 15 तोळे सोन्याचे दागिने प्रियकराने चोरुन नेल्याप्रकरणी सिकंदर खान अकबर खान (36) रा. निजामगंज कॉलनी भवानीनगर या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथील न्यू बायजीपुरा भागात राहणा-या गृहीणीसोबत सिकंदरचे प्रेमसंबंध गेल्या दोन वर्षापासून सुरु होते. दोघे सोबतच रहात होते. विवाहीत सिकंदरला दोन मुले देखील आहेत. 22 ऑक्टोबर रोजी त्याची प्रेयसी तिच्या आईकडे चेलीपुरा भागात गेल्याची संधी साधत त्याने हात की सफाई केली. 23 ऑक्टोबर रोजी घराचे कुलुप तुटले असल्याचे व चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी जिन्सी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. चोरी झाली त्या महिलेच्या घरात नेहमी एक जण येत असल्याचे शेजा-यांनी पोलिसांना माहिती दिली. सखोल चौकशी व तपासात व सिकंदर यास ताब्यात घेतले असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. प्रेयसीच्या लग्नाच्या तगाद्याला वैतागून आपण चोरी केल्याचे त्याने कबुले केले. पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक शेख हारुण, गोकुळ ठाकूर आदींनी या तपासात सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here