अवैध बायो डिझलचा काळाबाजार उघडकीस

जळगाव : भुसावळ तालुका पोलिस स्टेशन हद्दीत दिपनगर नजीक सुरु असलेल्या बायो डिझलच्या चोरट्या विक्रीसह साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 31 ऑक्टोबरच्या सुरुवातीला मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास छापा घातला. या छाप्यात हॉटेल निर्मल या ढाब्याजवळ उभ्या असलेल्या एका मिनीट्रकजवळ बायो डिझलची चोरटी विक्री सुरु असल्याचे पोलिस पथकाला आढळून आले.

अरबुज शेख निसार शेख (19) रा. वरणगाव ता. भुसावळ असे चोरटी विक्री करणा-या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पंप चालक हितेश वासुदेव शर्मा (24) रा. वरणगाव ता. भुसावळ आणि सिकंदर खान इस्माईल खान (50) रा. मिल्लतनगर भुसावळ यांना देखील ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिसात अत्यावश्यक वस्तु अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपासकामी त्यांना भुसावळ तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटाकेतील तिघांच्या ताब्यातून बायो डिझल विक्री व साठा करण्यासाठी लागणारे साहित्य, मिनी टॅंकर व डिझलने भरलेला ट्रक व डिझेल असा एकुण 7 लाख 37 हजार 20 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पो.नि. किरणकुमार बकाले यांनी तयार केलेल्या पथकातील पो.नाईक रणजीत जाधव, किशोर राठोड, पो.कॉ. श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील तसेच भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी हे.कॉ. विठ्ठल फुसे, प्रेम सपकाळे, संजीव मेढे, आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here