पाचवी पास ट्रकचालकाच्या ऑनलाईन प्रेमात अडकली—— दोन बायकांचा धनी असल्याचे समजताच जाम भडकली

औरंगाबाद : सोशल मिडीयाच्या माध्यमातून पदवीधर तरुणी एका तरुणाच्या प्रेमात फसली. सहा महिन्यांपासून सुरु असलेला प्रेमाचा सिलसिला सत्य परिस्थिती समजल्यानंतर थबकला. आपली फसगत झाल्याचे तरुणीला समजले. ज्या तरुणावर प्रेम करण्यासाठी तिने नागपुर ते औरंगाबाद पल्ला गाठला तो पाचवी पास असल्याचे तिला समजले. एवढेच नव्हे तर तो एक ट्रक चालक असून त्याला अगोदरच दोन बायका असल्याचे समजल्यानंतर तिने डोक्याला हात लावून घेतला.

नागपूरच्या एका तरुणीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून औरंगाबादच्या निसार नावाच्या तरुणावर प्रेम केले. गेल्या सहा महिन्यापासून दोघांचे सोशल मिडीयावर प्रेम सुरु होते. त्याच्यासोबत पळून जाण्याचे तिने ठरवले. ठरल्यानुसार तिला घेण्यासाठी निसार नागपुरात दाखल झाला. तिने त्याच्यासोबत नागपुर येथून पलायन करत औरंगाबाद गाठले. औरंगाबाद येथे आल्यावर बुधवारी दोघे जण एके ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले. तेवढ्यात निसारच्या दुस-या पत्नीच्या शालकाने त्याला अनोळखी तरुणीसोबत रंगेहाथ पकडले. त्याठिकाणी निसारची यथेच्छ धुलाई करण्यात आली. या धुलाईचे कारण त्याच्यासोबत पळून आलेल्या पदवीधर तरुणीला समजले. ज्या निसार सोबत आपण पळून आलो तो अगोदरच विवाहीत असून दोन बायकांचा धनी असल्याचे तिला समजले. एवढेच नव्हे तर तो पाचवी पास असून ट्रक चालक असल्याचे तिला समजले.

या हाणामारीची माहिती समजताच क्रांती चौक पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थीतीवर जेमतेम नियंत्रण मिळवत सर्वांना पोलिस स्टेशनला आणले. पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे व त्यांच्या सहका-यांनी सर्व परिस्थिती समजून घेतली. केवळ सोशल मिडीयाच्या मैत्रीवर विश्वास ठेवून एखाद्यावर प्रेम करणे चुकीचे ठरत असल्याचे पोलिस निरीक्षक दराडे यांनी नागपूर येथून पळून आलेल्या तरुणीला समजावले. तिला तिची चुक समजली व उमगली. तिच्या वडीलांशी तिचे बोलणे करुन देण्यात आले. त्यानंतर सोशल  मिडीयाच्या माध्यमातून निसारच्या प्रेमात दिवानी झालेल्या तरुणीने पुन्हा आपल्या घरी नागपुरला जाण्याचे निश्चीत केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here