जनमत प्रतिष्ठानच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांना फराळ वाटप

जळगाव : कोरोनाच्या प्रतिकुल कालावधीत देखील वृत्तपत्र विक्रेत्यांनी वृत्तपत्र वितरीत करुन आपली सेवा अबाधित ठेवली. जगाच्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेत्यांनी चोखपणे बजावले. जनमत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत वृत्तपत्र विक्रेते बांधवांना दिवाळीचा फराळ वाटप कार्यक्रमात जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन बोलत होत्या. वृत्तपत्र विक्रेते बांधव लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा एक महत्वाचा घटक असल्याचे त्यांनी पुढे बोलतांना म्हटले. ऑनलाईन वाचकांच्या जगात वृत्तपत्र वाचकांचे एक वेगळे स्थान असून त्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांची मह्त्वाची भुमिका असल्याचे देखील महापौर महाजन यांनी यावेळी म्हटले.

याप्रसंगी महापौरांच्या हस्ते व जनमत प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी निमीत्त तसेच स्व. किसन नाले स्मरणार्थ वृत्तपत्र स्टॉल धारक विक्रेत्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळीक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष विनोद नेवे, उप सचिव प्रतीक बोरडिया, प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र नेरकर, सर्व स्टॉलधारक वृत्तपत्र विक्रेते यावेळी उपस्थित होते. जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, दिलीप भारंबे, महेश लाठी, गणेश नाले, संजय कुमार सिंग, राजेंद्र वर्मा, गुणवंत पाटील, हर्षाली पाटील आदींनी कार्यक्रम यशस्वी केला. सुत्र संचलन महेश लाठी व राहुल पवार यांनी केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here