रुग्ण महिलेस त्रास देणारा कर्मचारी अटकेत

भावाची हत्येनंतर सासरवाडीत लपला तिघा साथीदारांसह पोलिसांना गवसला

पुणे : काही दिवसांपूर्वी पनवेल येथील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला होता. या घटनेची शाई वाळत नाही तोवर अशीच एक घटना समोर आली आहे. पुण्याच्या सिंडगड कॉलेजमधील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका महिलेला मध्यरात्री कर्मचाऱ्याने त्रास दिल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी लोकेश दिलीप मते (३०) रा. राजयोग सोसायटी, धायरी, पुणे या कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे. २७ वर्षाच्या पिडीत महिलेने या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. सिंहगड कॉलेज मधील पाच होस्टेल प्रशासनाने कोविड केअर सेंटरसाठी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी १५०० बेडची व्यवस्था केली आहे. १४ जुलै रोजी धायरी येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

तिला प्रशासनाच्या वतीने वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. १६ जुलै रोजी महिला कक्षात एकटी होती. त्यावेळी तेथील कर्मचारी लोकेश मते हा थेट महिलेच्या खोलीत आला. सुरक्षेचे कारण सांगून त्याने महिलेचा मोबाईल नंबर घेतला. मध्यरात्री एकच्या सुमारास त्याने महिलेस मिस्ड कॉल केला.

आपल्याला काही अडचण असल्यास सांगा असा मेसेज करत त्याने महिलेस त्रास द्यायला सुरुवात केली. त्यानंतर फोनवर असभ्य भाषेत बोलला. त्यानंतर त्याने त्या महिलेचा दरवाजा सकाळपर्यंत ठोठावण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या महिलेने १०० नंबरला फोन करत मदत मागितली.

रात्रपाळीत असणाऱ्या मार्शलनी पीपीई किट नसल्याचे कारण पुढे करत येऊ शकत नसल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी पीडीत महिलेच्या नातेवाईकांनी पालिकेकडे तक्रार केली. त्यानंतर या महिलेची इतरत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या निमित्ताने कोविड सेंटरमधील महिला रुग्णांचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here