पिस्टलच्या व्यवहारात पोलिसाचा सहभाग

Handgun isolated on white

धुळे : हाडाखेड ता. शिरपूर येथे गावठी पिस्टल व जिवंत काडतुस जप्त करत दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. लवकुश डगोर व आकाश राठोड अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

या दोघांपैकी लवकुश  डगोर हा मध्यप्रदेश पोलिस आहे. या मध्यप्रदेशातील पोलिस कर्मचा-यावर शिरपूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. हाडाखेड शिवारात गावठी पिस्टलचा व्यवहार होणार असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना समजली होती. याकामी दोन जण येणार असल्याची देखील माहिती समजल्यामुळे दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने लवकुश नथुसिंग डगोर (28) व आकाश सुरजमल राठोड (22) दोघे रा. सेंधवा जिल्हा बडवाणी मध्यप्रदेश या दोघांना चौकशीकामी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुस, मोबाईल व इतर साहित्यासह त्यांच्याकडील मोटारसायकल जप्त करण्यात आली. दोघांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरु आहे. लवकुश डगोर हा मध्यप्रदेशातील पोलिस आहे. पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील व अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here