प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना पोलिसाची शिवीगाळ

अहमदनगर : रेतीची बेकायदा वाहतूक सुरु असतांना त्यावर कारवाईसाठी आलेले प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याने शिवीगाळ केल्याचा प्रकार उघड आहे.
कर्जत पोलीस स्टेशनला या घटनेप्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यातील कर्जत शहरात सुरु असलेल्या अवैध रेती वाहतूकीवर प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व त्याचे सहकारी तहसीलदार नानासाहेब आगळे, मंडळाधिकारी बाळासाहेब सुद्रिक, तलाठी केसकर व रवि लोखंडे असे सर्वजण शहरातील रमेश जनार्दन कोळेकर यांच्या घरासमोर सुरु असलेल्या बांधकामावर कारवाईसाठी गेले. त्याठिकाणी तीन ब्रास रेतीने भरलेले ट्रक त्यांना आढळून आले. घटनास्थळावर पोलिस कर्मचारी केशव व्हरकटे हजर होता.
प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी त्याचे व घटनास्थळाचे चित्रीकरण सुरु केले. व्हरकटे याने रेतीचा ट्रक प्रांताधिकारी कार्यालयात घेऊन जाण्यास होकार दिला. दरम्यान डॉ. थोरबोले हे ट्रकच्या बाजूला जाताच पोलिस कर्मचारी व्हरकटे याने ट्रक चालकाला ट्रकसह पळून जाण्यास सांगितले व शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर व्हरकटे तेथून निघून गेला.
व्हरकटेविरुद्ध तलाठी दीपक बिरुटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here