हिरोच्या पत्नीचा हनी ट्रॅप फंडा! ——— ब्लॅकमेल करुन घालायची गंडा!!

sex racket imaginary image

मुंबई : नव्वदीच्या दशकातील सिने कलाकाराच्या पत्नीला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हनी ट्रॅपप्रकरणी ताब्यात घेतले आहे. सपना असे तिचे नाव असून तिचे तिघे साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
फॅशन डिझायनर असलेल्या सपनाच्या घरातून 29 लाख रुपयांची रोकड, 7 महागडे मोबाईल, दोन कार व जवळपास दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केले आहे.

किटी पार्टीच्या माध्यमातून बड्या व्यावसायिकांसोबत जवळीक साधत हनी ट्रॅपच्या माध्यमातून त्यांना आर्थिक हानी पोहोचवण्याचे काम ती करत होती. या उद्योगातील तिचे साथीदार फरार झाले आहेत. पोलिस त्यांच्या मागावर आहेत. तिच्या या हनी ट्रपच्या माध्यमातून श्रीमंतांची आर्थिक हानी करण्याच्या उद्योगात काही महिला मॉडेल देखील सामील असल्याचे म्हटले जात आहे. कोल्हापूर येथील एका बड्या उद्योजकास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा धाक दाखवत लाखो रुपयात गंडवले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here