महापौरांच्या नातेवाईकाच्या रेशन दुकानाबाबत तक्रार

जळगाव : जळगाव शहर व परिसरातील 123 स्वस्त धान्य दुकानदारांच्या कथित धान्य घोटाळ्याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. स्वस्त धान्य दुकानदारांचा बचाव करण्यासाठी जळगाव शहर महापौर, उप महापौर यांच्यासह नगरसेवकांची फौज सरसावली. या सर्वांनी मिळून एकाच मजकुराचा ढाचा (मथळा) गिरवत स्वस्त धान्य दुकानदार निरपराध असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. गैरप्रकाराचा खल नोव्हेंबर 2021 या महिन्याचा सुरु असतांना व मागणी नसतांना महापौर, उप महापौर, नगरसेवक, ग्रामपंचायत आदींनी स्वस्त धान्य दुकानदारांचा डिसेंबर 2021 या महिन्याचा कारभार चांगला असल्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या पुढ्यात सादर केले आहे.

या प्रकरणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी रणशिंग फुंकत या प्रकाराला समोर आणले. हळूहळू एक एक लाभार्थी ग्राहक पुढे येत महसुल प्रशासनाकडे लेखी स्वरुपात तक्रारी देऊ लागला आहे.

महापौर जयश्री महाजन रहात असलेल्या मेहरुण परिसरात त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचे 38/6 क्रमांकाचे रेशन दुकान आहे. मागणी करुनही आपल्या हक्काचे धान्य आपणास या दुकानातून मिळत नसल्याची लेखी तक्रार शेख सईद शेख रशीद कुरेशी या लाभार्थ्याने महसुल प्रशासनाकडे केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here