अनोळखी मयत महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन

जळगाव : जळगाव तालुक्यातील आमोदा खुर्द ते घार्डी दरम्यान कोणत्यातरी वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचे निधन झाले आहे. 15 डिसेंबरच्या रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अपघाती निधन झालेल्या महिलेचे वय अंदाजे 70 ते 75 आहे.

पोलिस पाटील राहुल दिलीप सपकाळे यांनी दिलेल्या खबरीनुसार या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. छायाचित्रातील महिलेची ओळख पटल्यास हे.कॉ. विश्वनाथ गायकवाड (9594941615), अनिल तायडे (94234 92108), जळगाव तालुका पोलिस स्टेशन (0257 225 3002) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here