कथित शिष्यवृत्ती प्रकरणी तोंडापूर जि.प.शाळेची चौकशी

जळगाव : तोंडापूर ता. जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या कथित शिष्यवृत्ती अपहार प्रकरणी चौकशीला सुरुवात झाली आहे. या शाळेत मागास विद्यार्थ्याचा शिष्यवृत्तीचा अपहार झाला असल्याची तक्रार शालेय व्यवस्थापन समिती सदस्या शितल जाधव यांनी गट विकास आधिका-यांकडे केली होती. याबाबत प्रसार व समाज माध्यमांतून मागोवा घेण्यात आला होता.

कथित अपहाराच्या चर्चेने वेग घेतल्यानंतर प्रशासनाने याप्रकरणी लक्ष घालण्यास सुरुवात केली. शिक्षण विभागाच्या संबंधीत अधिका-यांनी गुरुवारी शाळेत येऊन चौकशी केली. मुख्याध्यापक गैरहजर असल्याने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडू कलाल यांच्यासह काही सदस्यांच्या उपस्थितीत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांच्या कपाटाचे कुलुप तोडून काही कागदपत्रांची पाहणी व पडताळणी केली. त्यानंतर ती कागदपत्र पथकाने हस्तगत केली.

शिष्यवृत्तीच्या रकमेबाबत पथकाला कोणतीही माहीती मिळाली नसली तरी वीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आल्याची नोंद आढळून आली. अध्यक्षांना माहीत नसलेल्या या रकमेचा खुलासा बँक तपशीलातून बाहेर येणार असल्याचे पथकातील अधिका-यांनी सांगितले आहे. याप्रकरणी पुढे येणाऱ्या माहितीकडे संबंधितांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here