ऑनलाईन फसवणूक प्रकरणी फेटाळला दोघांचा अटकपूर्व जामिन

जळगाव : सायबर पोलीस स्टेशन, जळगांव अंतर्गत पारोळा येथील व्यावसायिक संजय मोहनलाल शर्मा यांनी साईराम बालाजी पाटील व परमेश बालाजी पाटील (दोन्ही रा. हैद्राबाद) यांच्या विरुध्द दि. २२/१०/२०२१ रोजी फिर्याद दाखल केलेली होती.

फिर्यादीतील मजकुरानुसार संबंधित व्यक्तिंनी फिर्यादीला जुलै-२०२० ते ऑक्टोंबर-२०२१ पावेतो “डेनिम हब लाईफस्टाईल प्रा.लि. या कंपनीची
फ्रॅंचाईजी देतो व त्या बदलात तुमच्या दुकानासाठी दरमहा भाडेसुध्दा दिले जाईल” असे फोनवरुन कळविले. “त्यासाठी अँडव्हान्स म्हणून पाच लाख रुपये जमा करावे लागतीन असे सांगितले”. त्यामुळे फिर्यादीने संबंधितांनी दिलेल्या बँकेतील खात्यावर वेळोवेळी रक्कम रुपये पाच लाख जमा केले. मात्र, त्यानंतर या आरोपींनी ठरल्याप्रमाणे कोणताही माल पाठवला नाही. तसेच दुकानासाठी फर्निचरसुध्दा करुन दिले नाही. त्यामुळे संजय शर्मा यांनी फिर्याद दाखल केली होती.

फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीसांनी तपास केला असता, फैजपुर येथील मयुर मंडवाले यांचे रक्कम रुपये चार लाख, धुळे येथील नारायण शिंपी
यांचे रक्कम रुपये सात लाख, चाळीसगांव येथील योगेश महाले यांचे रक्कम रुपये सात लाख तर पालघर येथील ओमप्रकाश व्यास यांचे रक्कम रुपये सहा लाख अशी सर्वांची मिळुन एकूण रक्कम रुपये एकोणतीस लाखांची आर्थिक फसवणूक केलेली आहे.

सदर आरोपींना फौजदारी प्रकिया संहितेचे कलम ४१(अ) नुसार त्यांच्यासमोर हजर राहण्याबाबत नोटीस दिली. परंतू, सदर आरोपींना अटकेची भिती असल्यामुळे या गुन्ह्याच्याकामी अटकेपासुन संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी जळगांव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात फौजदारी जामिन अर्ज क. १०४०/२०२१ अटक पुर्व जामिन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता. त्या अर्जाच्या कामी दि. १७/१२/२०२१ रोजी सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी लेखी खुलासा व त्यासोबत तपासाचे कागदपत्र जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांच्याकडे दिले.

जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी दि. १७/१२/२०२१ रोजी न्यायालयासमक्ष युक्तिवाद करुन तपासाची कागदपत्रे न्यायालयाला सादर केला. न्यायालयाने आज दि. १८/१२/२०२१ रोजी दोन्ही आरोपींची तपासा दरम्यान आवश्यकता असल्याच्या कारणाने तसेच खुप मोठी आर्थिक फसवणूक असल्याने त्यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला. सदर अर्जाच्याकामी सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर मुळ फिर्यादी संजय शर्मा यांच्यातर्फे अँड. अकिल ईस्माईल यांनी काम पाहिले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here