खंडणीबाज रा.कॉ. पदाधिकारी 20 पर्यंत कोठडीत

चंद्रपूर : दरमहा पन्नास हजाराची खंडणी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांच्याकडे मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर सचिवास 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नयन साखरे असे अटकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रपूर शहर सचिवाचे नाव आहे. मागणीच्या 50 हजारांपैकी तडजोडीअंती  35 हजार घेत असतांना साखरे यास रामनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावून व्हिडीओ काढून तक्रारीची धमकी देण्याचे काम साखरे याच्याकडून सुरु होते. शनिवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. त्यास 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here