जामनेर नजीक अपघात 2 ठार 3 जखमी

जळगाव : जामनेर ते पाचोरा दरम्यान टाकळी गावानजीक नागदेवता मंदिराजवळ भरधाव वेगातील आयशर वाहनाने इंडिकाला दिलेल्या धडकेमुळे अपघाताची घटना आज सकाळी घडली. इंडिका चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ती कार नाल्यात जावून कोसळली. या अपघाती घटनेत एक पुरुष व महिला असे दोघे जण जागीच ठार झाले आहेत. तीन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यातील सहा महिन्याचे बाळ बचावले आहे.

पंकज गोविंदा सैंदाणे (25) रा. तुकाराम नगर भुसावळ), सुजाता प्रवीण हिवरे (30) रा. त्रिमूर्तीनगर भुसावळ) हे ठार झाले आहेत. हर्षा पंकज सैंदाणे, नेहा राजेश अग्रवाल, प्रतिभा जगदीश सैंदाणे असे जखमी झाले आहेत. स्पंदन पंकज सैंदाणे (6 महिने) हा बाळ बचावला मात्र त्याचे पितृछत्र हरपले आहे. त्याच्या आईवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here