लाचेची मागणी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ लिपीकास भोवली

जळगाव : योगेश अशोक खोडपे या जिल्हा परिषदेतील वरिष्ठ लिपीकास लाचेची मागणी आज महागात पडली. जळगाव एसीबीच्या पथकाने या लिपीकास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराचा लहान भाऊ आर.आर.विद्यालय जळगाव येथे सन 2014 पासुन शिक्षक या पदावर विना अनुदानीत तत्वावर नोकरीस आहे. त्याच्या विना अनुदानीत तत्वावरुन अनुदानित तत्वावर शिक्षण सेवकपदी नियुक्तीस मान्यता देण्याकामी अनुकूल अहवाल पाठविण्याच्या मोबदल्यात योगेश खोडपे याने 2 लाख 30 हजार रुपयांची वेळोवेळी मागणी केली. लहान भावाच्या कामासाठी मोठ्या भावाकडे लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न झाले.

याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरीष्ठ लिपिक योगेश अशोक खोडपे रा.ममता राणे नगर,वाघ नगर,जळगांव याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील कडासने (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक), एन.एस.न्याहळदे (अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र), सतीश डी.भामरे (वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत श्रीराम पाटील (पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव) यांनी सदर कारवाई केली. त्यांना सापळा पथकातील पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील,पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ आदींची मदत लाभली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here