थकीत वीज बिल ग्राहकाची अभियंत्यास मारहाण

जळगाव : थकीत वीज बिल भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने घरी आलेल्या सहायक अभियंत्यास ग्राहकाने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिकमदास परमानंद पोपटानी असे गुन्हा दाखल झालेल्या वीज ग्राहकाचे नाव आहे. जयेश रजनीकांत तिवारी असे तक्रारदार अभियंत्यांचे नाव आहे.

टिकमदास पोपटानी यांच्याकडे अडीच महिन्यापासून 2 हजार 460 रुपये बिल बाकी होते. या रकमेचे बिल भरण्यासाठी अभियंता तिवारी व त्यांचे सहकारी पोपटानी यांना सूचना देण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. घरी बिल मागण्यासाठी आल्याचा राग आल्याने पोपटानी यांना राग आला. त्यांनी आलेल्या सर्वांना शिवीगाळ, दमदाटी केली. हातात टिकाव घेऊन अभियंता तिवारी यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तिवारी व त्यांच्यासोबत असलेले योगेश जाधव यांच्या डाव्या कानाला तसेच नमो सोनकांबळे यांना पाठीला मार लागला.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, मुदस्सर काजी, इम्रान सय्यद असे घटनास्थळी रवाना झाले.त्यांनी पोपटानी यांना ताब्यात घेत पुढील कारवाई केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिकमदास पोपटानी यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे व किरण पाटील करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here