प्राणघातक हल्ल्यातील दोघे फरार अटक

जळगाव : आर्थिक व्यवहारातून हाणामारी व चाकू हल्ला करणा-या दोघा फरार आरोपींना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. संदीप पोपट पाटील व शिवाजी पाटील अशी दोघांची नावे आहेत. यातील भावेश पोपट पाटील हा अद्याप फरार असून पोलिस त्याच्या शोधात आहेत. 16 डिसेंबर रोजी या घटनेप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिकअप चार चाकी वाहन चालक धनराज गजानन कोळी (रा. हुडको खेडी बु ता. जि. जळगाव) हा परभणी येथून जळगाव येथे रात्री अकरा वाजता घरी परत आला होता. त्यावेळी भावेश पोपट पाटील, संदिप पोपट पाटील व शिवाजी पाटील अशा तिघांनी त्याला बघून शिवीगाळ केली होती. भावेशकडे धनराज याचे उधारीचे पैसे घेणे बाकी होते. या तिघांसोबत धनराज कोळी याचे तीन महिन्यांपूर्वी हाणामारीसह वाद झाले होते.

त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संदीप व शिवाजी या दोघांनी धनराज यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण  केली होती. भावेशने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने धनराज वर चाकू हल्ला केला होता. या हल्ल्यात धनराजच्या डाव्या हाताच्या दंडावर, पोटाच्या डाव्या बाजुस कमरेच्यावर दुखापत झाली. त्यानंतर झालेली गर्दी बघून तिघे हल्लेखोर पळून गेले होते.

जखमी धनराज याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला भावेश पोपट पाटील, संदिप पोपट पाटील व शिवाजी पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्राणघातक हल्यातील तिघे आरोपी गुन्हा घडल्यापासून पसार होते. त्यापैकी संदीप पाटील व शिवाजी पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, जितेंद्र राठोड, समाधान टहाकळे, सचिन मुंडे, यशोधन ढवळे, पोलीस चालक इम्तियाज खान आदींनी त्यांना ताब्यात घेत अटक केली.  न्यायमूर्ती ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार तर्फे अँड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे व किरण पाटील करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here